Socialise, Networking
Dr. Smita & Dr. Ravindra Kolhe (Padmashree Award Winner)
- 23/09/2022
- Melbourne, AUS
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती
शेगाव मध्ये जन्म आणि नागपूरला वैद्यकीय शिक्षण आणि सुखाचे जीवन ह्या पेक्षा कितीतरी वेगळं नशीब होते पद्मश्री डॉ. कोल्हे ह्यांचे. बाबा आमटे, विनोबा भावे आणि महात्मा गांधी ह्याच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या ह्या तरुणाला वेगळी वाट चोखाळायची होती . कोणताही कौटुंबिक पूर्वइतिहास नसताना स्वतःला गंभीर आजार असताना केवळ आत्मशक्तीच्या बळावर एखादी व्यक्ती केवढे काम उभारू शकते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे यांचे हे मेळघाट येथील कार्य आहे.
कौटुंबिक जबाबदारी ही वेगळ्या वाटेने चालणाऱ्या तरुणांच्या कामातला अडथळा असते. इथेच डॉ. स्मिता कोल्हे ह्याचे वेगळं पण स्पष्ट होते . पाच रुपयात लग्न आणि चारशे रुपयात संसार अशी जगावेगळी अट स्वीकारून फक्त संसाराचं केला नाही तर खंबीर पणे उभे राहून तोलामोलाची साथ दिली.
समाज कार्य वाटते तसे सोपे नसते. प्रवाहा विरुद्ध पोहताना कितीतरी प्रस्थापितांचा अडथळा पार करावा लागतो. अक्षरशः परिस्थितीशी झगडावे लागते. कुठलेही पारिवारिक वलय नसताना शासन प्रशासन आणि लाभार्थी ह्यांच्याशी परक्या गावात झुंज घेणे सोपे नसते.
आलेल्या कित्येक आणीबाणीच्या वेळी एकमेकांची साथ न सोडता जिद्दीने प्रसंगी दोन हात करून परिसराचा संपूर्ण कायाकल्प घडविला. आदिवासी गावात राहून ह्यांची सेवा करून त्यांचेच जीवनमान पत्करले. अथक परिश्रमाने परिसरातले आरोंग्यमान उंचावले, बालमृत्यूचे प्रमाण घटले, आणि राहणीमान उंचावले. हळू हळू जीवनशैली बदलायला वेगवेगळे शिक्षणवर्ग, ग्रामीण सभा , शेतीचे प्रयोग, आहाराचे महत्व , महिला सशक्तीकरण, स्वस्त धान्य मोहीम , भाजी विक्री सारख्या मोहिमा राबवायला सुरुवात केली .
भारत साकार ने त्यांना २०१९ मध्ये कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री अवॉर्ड ने पुरस्कृत करून त्यांच्या कार्याची दाखल घेतली.
त्यांचा मोठा मुलगा रोहित शेतकरी असून वेगवेगळे प्रयोग करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करत असून इतर शेतकरी बंधूना मदत करतो . लहान मुलगा राम कोल्हे हा डॉक्टर आहे