Samvadika 2

Home / Samvadika 2

संवादिका -

।। श्री ।।

नमस्कार ,

संवादिका शृंखलेतील दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. संवादिकेच्या पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे आपलेअखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२२”, हे दिनांक २३, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केलेले आहे आणि त्याची तयारीही जय्यत सुरु आहे. ह्या महिन्यातील अपडेट्स खालीलप्रमाणे:

स्पॉन्सरशिप टीम:

स्पॉन्सरशिपची पॅकेजेस फायनल झालेली असून, टीमकडून ऑस्ट्रेलियनच नाही तर ओव्हरसीज स्पॉन्सरर्सशी सुद्धा संपर्क करणे, पॅकेजेसबद्दल माहिती देणे आणि कार्यक्रमासाठी फंड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

आयटी टीम:

AAMS वेबसाईटचे काम अतिशय वेगाने सुरू असून जानेवारी २०२२ पर्यंत वेबसाईट पूर्ण करण्याचे टार्गेट टीमने ठेवले आहे. ह्यामुळे आपल्याला Early Bird Ticket बुकिंग करण्यासाठी मदत होणार आहे.

फायनान्स टीम:

इतर कामांबरोबरच फायनान्स टीमही अतिशय आकर्षक दरामध्ये संमेलनाचे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ह्याबद्दल अजून डिटेल्स लवकरच वेबसाईटवर पोस्ट केले जातील.

संमेलन समितीकडून काही अपडेट्स खालीलप्रमाणे:

१. पहिलया संवादिकेमध्ये समितीने Volunteers साठी केलेल्या आवाहनाला भरगोस प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. संमेलनाच्या कार्याला हातभार लावू इच्छिणाऱ्या सदस्यांची यादी समितीकडे तयार होत आहे. आपल्या सर्वांच्या मदतीने हे कार्य सिद्धीस नेण्यास समितीला मदतच होणार आहे. अजूनही ज्यांना ह्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी volunteers@aams2022.org.au ह्या ई-मेलवर लवकरात लवकर नोंदणी करावी हि विनंती.

२. संमेलनातील अडीच दिवसांच्या कार्यक्रमांची प्राथमिक आराखणी झाली असून व्याख्याने, मनोरंजनाचे कार्यक्रम, प्रदर्शने आणि इतर कार्यक्रम ह्यांचे डिटेलिंग करणे सुरु आहे.

३. संमेलनाच्या आधी तीन महिन्यांपासून निरनिराळ्या विषयांवरील ऑनलाईन व्याख्याने आणि कार्यशाळा घेण्याचा समितीचा मानस आहे. ऑनलाईन असल्यामुळे कुठल्याही वेळेच्या आणि स्थळाच्या बंधनाशिवाय, ऑस्ट्रेलियाच नाही तर जगातून कुठूनही ह्याचा लाभ इच्छुकांना घेता येईल.

४. संमेलनाचे ठिकाण फायनल झालेले असून त्याचे बुकिंगही झाले आहे.

५. कम्प्लायन्स टीम सध्या स्पॉन्सरर्स, केटरर्स, पाहुणे कलाकार आणि संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इतर संस्था ह्या सगळ्यांबरोबर कराव्या लागणाऱ्या ऍग्रिमेंट्सवर सध्या काम करत आहे.व्हिक्टोरिया आणि इतर राज्यातील महाराष्ट्र मंडळांबरोबर त्यांच्या संमेलनातील सहभागाबद्दल आणि इतर प्लॅनिंगबद्दल बोलणी सुरु झालेली आहेत.

६. संमेलनातील कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही लवकरच EOI मागवणार असून ज्या सदस्यांना त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी सदर ईमेलला रिप्लाय करून नावनोंदणी करावी.

७. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या खालील कलाकारांशी प्राथमिक बोलणी सुरु आहेत: (**अद्याप खालील अतिथी, कलाकारांची, मान्यवरांची पुष्टी झालेली नाही आणि ह्या आमच्या आतापर्यंतच्या चर्चेवर आधारित केवळ प्रारंभिक पेन्सिल बुकिंग आहेत, कृपया ह्याची नोंद घावी.)

I. पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे

II. पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे

III. पद्मश्री सिंधुताई सपकाळ

IV. अवधूत गुप्ते

V. स्पृहा जोशी

VI. हास्यजत्रा टीम (समीर चौगुले आणि टीम)

VII. नंदेश उमप

VIII. सुहास खामकर

८. मीडिया पार्टनर्स - सोनी टीव्ही, Yupp टीव्ही ह्याबरोबरच ट्रॅव्हल पार्टनर, केसरी टूर्स ह्यांनीही सहकार्याची तयारी दाखवलेली आहे.

पुढील महिन्यात आणखी अपडेट्ससह पुन्हा भेट होईलच. संवादिका ह्याच सदरातून. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.

आपला स्नेहांकित,
यशवंत जगताप
अध्यक्ष-महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया आणि संयोजक-अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२२